मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Zee News ला 2018 मधील दिली पहिली मुलाखत
झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट लाईव्ह मुलाखत घेतली. मोदींनी जीएसटी, नोटबंदी, बेरोजगारी, वन नेशन वन इलेक्शन यासारख्या मुद्यांवर आपले विचार समोर आणले. 2019 च्या निवडणुकीवर पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अगदी खास अंदाजात आपलं उत्तर दिलं आहे. पीएम मोदी यांनी सांगितलं की, मी निवडणूकीच्या हिशोबात माझा वेळ वाया घालवत नाही. मला देशातील नागरिकांवर पूर्ण विश्वास आहे.
1 फेब्रुवारीपासून सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला अजेंडा सांगितला. तो अजेंडा म्हणजे विकास, विकास आणि फक्त विकास
हा प्रश्न विचारल्याबद्दल मोदींनी झी न्यूला धन्यवाद म्हटलं. मोदींनी म्हटलं की, देशात कायम निवडणुकीचं वातावरण असतं. निवडणूका जवळ आल्या की फेडरल स्ट्रक्टरला धक्का लागतो. राजकीय पक्षांमध्ये तू तू - मैं मैं सुरू असतं. वर्षातील एका उत्सवाप्रमाणे निवडणूका देखील एका निश्चित वेळेत असायला हव्यात.
सुरक्षा दलातील लाखो जवान कायम या निवडणूकीत अडकलेले असतात. राज्यातील मोठ्या अधिकाऱ्यांना ऑब्जर्वरच्या रुपात दुसऱ्या राज्यात जावे लागते. पोलिंग बूथवर अनेक लोक उपस्थित असतात. तसेच खूप मोठी रक्कम या निवडणूकीवर खर्च होते. आता देशातील मतदार हा समजूतदार आहे. ते लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीतील फरक ओळखतात. या दोन्ही निवडणूका एकत्र झाल्या पाहिजेत. याच्या बरोबर एक महिन्यानंतर स्थानिक निवडणूका झाल्या पाहिजेत. सगळे एकत्र येऊन हा विचार करत असतील तर ते शक्य आहे. एकदा ही चर्चा सुरू झाली तर पुढे रस्ता नक्की सापडेल.