सिंधुदुर्ग: येत्या 12 सप्टेंबरलाच चिपी विमानतळावर विमानाचे लँडिंग होणार असल्याची माहित गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यानंतर 12 नोव्हेंबरला विमानतळावर पहिले चार्टड विमान उतरेल.
एका आंतरराष्ट्रीय विमान कंपनीने या विमानतळावर आठवड्यातून तीनदा विमानसेवा पुरवण्याची तयारी दर्शविली आहे. तत्पूर्वी 12 तारखेला चार्टड विमानाची प्रायोगिक चाचणी होईल. दोन महिन्यात डीजीसीएच्या परवानग्या पूर्ण केल्या जातील. त्यानंतर प्रवासी वाहतूक सुरु होईल.
काही दिवसांपूर्वी तांत्रिक पेचामुळे ही चाचणी पुढे ढकलण्याची चर्चा सुरु होती. मात्र, सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर दिल्लीला धाव घेऊन यावर तोडगा काढला.
यापूर्वी हवाई चाचणीसाठी १० सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. या पहिल्या विमानातून सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युतीचे मंत्री प्रवास करणार होते.