देवगड : परिस्थिती अतिशय भीषण आहे, देवगड बंदरावर आत्ता बघितलं तर वादळाची पूर्वसूचना मिळाली होती, तरीही NDRF ची टीम इथे ठेवण्यात आली नाही. इथे अजूनही पूर्ण पंचनामे झालेले नाहीत. जे नुकसान झालं आहे त्याचे मूल्य कमी दाखवण्यात आलं आहे. प्रशासन गतिमान करणे आवश्यक आहे. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
'उद्धव ठाकरे म्हणाले,'मी काही फोटोसेशन करायला, हवाई दौरा करायला आलेलो नाही. मला काही राजकीय बोलायचं नाही. नाहीतर मी सुद्धा म्हणून शकतो की 3 तासांचा ( मुख्यमंत्र्यांचा ) दौरा आहे, पण ठीक आहे मुख्यमंत्री आले याचे समाधान आहे.' असाही टोला त्यांनी लगावला आहे.
जे लोकं म्हणतात पंतप्रधान गुजरातला गेले, महाराष्ट्रात आले नाहीत, मग मुख्यमंत्री दोनच जिल्ह्यातच का आले, रायगड - सातारा - कोल्हापूरला का गेले नाहीत. महत्त्वाचे काय आहे. तुम्ही काय दिलंत ? गेल्या वेळी कोकणाला काहीही दिलं नाहीत. नसत्या बाता मारायच्या, या सरकारच्या वतीने काहीही होत नाहीये. निसर्ग वादळाच्या वेळी येऊन पैसे दिलेले नाहीत आणि आता येऊन राजकीय वक्तव्य करत आहेत.असंही फडणवीस यावेळी म्हणाले.