बारसू रिफायनरीला होणारा राजकीय विरोध मावळतोय? उद्धव ठाकरे, अजित पवारांची सावध भूमिका
रिफायनरीचा प्रकल्प चांगला असेल तर लाठ्या-काठ्या कशाला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे आहे. तर विकासाला राष्ट्रवादीचा विरोध नाही मात्र पर्यावरणाचा ऱ्हास नको अशी सावध भूमिका अजित पवारांनी घेतली आहे.
'ठाकरे गटातील 13 आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार तर काँग्रेसचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात'
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. ठाकरे गटातील आमदारा आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्प : ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांच्या नोटीसा तर साळवी यांचा प्रकल्पाला पाठिंबा
Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. गेले दोन दिवस ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. आज तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत
Barsu Refinery : बारसूमध्ये विरोधानंतरही रिफायनरीचा सर्व्हे सुरु, बैठकीत तोडगा नाही
Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. सोमवार आणि मंगळवारी बारसूमध्ये ग्रामस्थांनी तीव्र विरोध करताना रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र...
बारसू रिफायनरीची खुलेआम चर्चा घडवा, मी येतो? लोकांच्या जीवाशी खेळू नका - भास्कर जाधव
Barsu Refinery Project : राजापूर येथील बारसू रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. कोकणातील जनता खरं काय आणि खोटं काही समजून घेणारी जनता आहे. आंदोलन करणारी लोक ही कोणत्या राजकीय पक्षाची नाहीत स्थानिक लोक आहेत, हे लक्षात घ्या, असा इशारा ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे.
Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी होणार की नाही, हे सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल - उदय सामंत
Barsu Refinery Project Protest : बारसू रिफायनरी प्रकल्प होणार की नाही, हे नंतर ठरणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर कंपनी याबाबत आपला निर्णय घेणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, विरोध कोण करतोय आणि त्यांना कोण भडकवत आहे, हे सगळ्यांना माहित आहे, असे ते म्हणाले.
रत्नागिरीत बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटला, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Barsu Refinery Project Protest: बारसू - सोलगाव रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध केला आहे. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येनं बारसू गावात आले होते .मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली.
Barsu Refinery : रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध; महिलांचा रस्त्यावर ठिय्या, पोलिसांची गाडी रोखली
Barsu Refinery Project : रिफायनरीला स्थानिकांनी तीव्र विरोध करताना रस्ता रोखला आहे. रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली आहे. रत्नागिरीतील रिफायनरी सर्वेक्षणाचा आज दुसरा दिवस आहे. ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सड्यावर उपस्थित आहेत.
Barsu Refinery Protest: बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन, आणखी तिघांना अटक
Barsu Refinery Project Protest : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू गावात रिफायनरीचं सर्वेक्षण सुरु आहे. याला स्थानिकांचा विरोध असून, आंदोलन सुरू आहे. रिफायनरीविरोधी संघटनेच्या आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध केल्याने राजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
रत्नागिरीत बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात, 17 पोलीस जखमी
Ratnagiri Police Van Accident: रिफायनरीचे सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात 17 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
Ratnagiri News : बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पुन्हा सर्व्हे, 1500 पोलिसांचा फौजफाटा तैनात
Ratnagiri Barsu Refinery Project : रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला ग्रामस्थांची तीव्र विरोध झाला. त्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प तेथून हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बारसू, सोलगावमध्ये रिफायनरी असा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार बारसूची निवड करण्यात आली.
मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीबाबत मोठा निर्णय
Mumbai Goa Highway : कोकणात तसेच गोव्यात जाणाऱ्यांना प्रवाशांना आता पंधरा दिवस थोडीशी कसरत करावी लागणार आहे. परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविण्यात येणार आहे.
Maharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा
Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे.
Cidco Lottery 2023 : सिडकोकडून नवी मुंबईत मध्यमवर्गीयांसाठी आता घरे
Cidco Lottery 2023 : सिडको नवी मुंबईत गृहसंकुल उभारणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांचं घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे. नावडे या नव्याने विकसित होणाऱ्या नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी स्वतंत्र टाऊनशिप उभारण्याचा सिडकोचा नवा प्रस्ताव आहे.
Rain in Maharashtra : पावसाबाबत मोठी बातमी, पुढचे 4 दिवस 'या' ठिकाणी जोरदार पाऊस
Rain in Maharashtra : आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाचे काम रखडल्याने उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि वाढते अपघात याबाबत वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या महामार्गाचे काम रखडल्याने कामाच्या डेडलाईनबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे.
Shocking : डोळ्यादेखत लेकीचा जीव गेला... काय वाटलं असेल त्या माऊलीला? एक क्षणात होत्याचं नव्हत झालं
Shocking : आजीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते गावी आले होते. मोठ्या आनंदात त्यांनी वाढदिवस साजरा केला. पण, एका क्षणात हसता खेळता माहौल दुखा:त बदलला.
मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आजपासून टोलवसुली सुरु..
Mumbai Goa Highway Toll : मुंबई - गोवा महामार्गावर आजपासून टोलसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण मुंबई - गोवा महामार्गावरचा पहिला टोलनाका सुरु झाला आहे. या टोलनाक्याला सर्वपक्षीय विरोध झाला होता. मात्र एनएचएआयने टोलला परवानगी दिल्यामुळे आजपासून टोलवसुली सुरु झाली आहे.
Maharashtra Weather Updates : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस
Maharashtra Weather Updates : राज्यात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे.
आजीबरोबर मुंबईतून कोकणात जाणाऱ्या नातवंडांचा प्रवास ठरला अखेरचा, तिघांचा मृत्यू...
मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि कार मध्ये भीषण अपघात, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील आजी आणि दोन नातवांचा समावेश. कोकणात निघालेल्या तावडे कुटुंबावर काळाचा घाला