विदर्भातील जेवण पद्धती अतिशय खास आहे. यामध्ये 'तर्री पोहे', 'सावजी मटण' आणि 'वांग्याची भाजी' यासोबतच आणखी एक पदार्थ लोकप्रिय आहे. तो म्हणजे गिला वडा. मुंबईत जसा 'वडापाव' लोकप्रिय आहे तसाच अमरावतीचा स्ट्रीट फुड पदार्थ म्हणजे 'गिला वडा'
अमरावतीचा गिलावडा हा मुळातच अमरावतीचा नाही. गिलावडा हा जरी अमरावतीत फेमस झाला तरी हा मुळचा बुंदेलखंडचा पदार्थ आहे. बुलेंदखंडचे लोक लग्नसमारंभात कुलदैवतांना गिला वड्याचा नैवद्य द्यायचे. नंतर या गिला वड्याची क्रेझ इतकी वाढली की, लग्न समारंभातील मेन्यूमध्ये दिसू लागला. बुंदेलखंडचे लोक मोठ्या संख्येने 1960 रोजी अमरावतीत स्थायिक झाले. आणि मग हा गिला वडा हा पदार्थ अतिशय लोकप्रिय झाला.
गिला वड्यातील सामुग्री अतिशय पौष्टिक आहे. उडीद डाळीपासून हा पदार्थ तयार केला जातो. अमरावतीतील प्रत्येक व्यक्तीने गिला वडाची टेस्ट चाखलेली असते. गिला वड्याचे साहित्य अमरावतीकर असा दावा करतात की, महाराष्ट्रात इतर कुठेही तो मिळत नसल्याचा दावा येथील व्यावसायिक करतात. 80 च्या दशकात काहींनी गिला वड्याचा व्यवसाय सुरु केला. आज व्यावसायिकांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे. उडीद डाळापासून तयार केलेला हा पदार्थ अतिशय पाचक आणि हेल्दी आहे.