कोलेस्टेरॉल कमी होत नाही? 'हे' 5 मसाले करतील मदत

How to Reduce High Cholesterol: उच्च कोलेस्टेरॉल असल्यास आपल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आपण आपल्या घरात सहज उपलब्ध असलेले मसाले वापरून उच्च रक्तदाब कमी करू शकतो. जाणून घेऊया कोणते आहेत हे मसाले.

Updated: Oct 14, 2024, 03:39 PM IST
कोलेस्टेरॉल कमी होत नाही? 'हे' 5 मसाले करतील मदत title=

Spices to Help Reduce High Cholesterol: उच्च किंवा खराब कोलेस्टेरॉल आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी नुकसानकारक असते. यामुळे अनेक आजार होऊ शकतात. वाढलेले अतिरिक्त कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये प्लेकच्या स्वरूपात जमा होते. यामुळे हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.

जर तुमचे कोलेस्टेरॉल वाढले असेल, तर तुम्ही कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी रोजच्या आहारात आणि सवयींमध्ये योग्य ते बदल करून निरोगी जीवनशैलीचे पालन करायला हवे. कोलेस्टेरॉल वाढण्याच्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे म्हणजे चूकीची आहार पद्धती. तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात फास्ट फूड खात असाल तर तुमची कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. याशिवाय धुम्रपान, अति प्रमाणात मध्यपान करणे, ताण, वय आणि कमी शारीरिक हालचाल अशा अनेक कारणांमुळे कोलेस्टेरॉल वाढते. 

पण मसाले काही प्रमाणात उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करू शकतात. मसाले हे अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्त्रोत आहेत. तंज्ञांच्या मते अन्नामध्ये मसाल्यांचा समावेश केल्यास शरीराला योग्य आणि आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. जे कोलेस्टेरॉल सारख्या जुनाट आजारांशी लढण्यास मदत करतात. पण लवकर काळजी न घेतल्यास कोलेस्टेरॉलमुळे हृदयासंबंधीत आजार होऊ शकतात.

हेही वाचा: सकळी उठताच पोट होईल साफ, रोज खा 'हे' एक फळ

 

हळद 

हळद हा एक प्राचीन आयुर्वेदिक मसाला आहे ज्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. त्यात कर्फ्यूमिन नावाचा घटक असतो. हळदीचे अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म फुफ्फुसाचे जुनाट आजार, स्वादुपिंडाचे रोग, आतड्यांसंबंधी समस्या, हृदया संबंधीत आजारांसाठी गुणकारी आहेत. महत्त्वाचे म्हणजे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

दालचिनी 

हृदया संबंधीत आजार दूर करण्यासाठी दालचिनी हा उत्तम मसाला म्हणून ओळखला जातो. याशिवाय ते शरीरातील अंतर्गत अडथळे दूर करते. दालचिनी इन्सुलिन उत्पादनास आणि रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.  

मिरची 

मिरचीमुळे जेवणाला चव तर येते पण मिरचीचे आरोग्यासाठीही फायदे आहेत. मिरची चरबीच्या पेशी कमी करण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याशिवाय पचन, श्वसना संबंधीत त्रास, खोकला आणि सर्दी बरी होण्यासही
मिरची मदत करते.

 मेथी 

मेथीचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. मेथी हा कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणाऱ्या महत्त्वाच्या मसाल्यापैकी एक आहे. त्यात काही विशिष्ट घटक असतात जे कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करतात.

बडीशेप 

बडीशेप चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. बडीशेपमध्ये असलेले फॅटी ॲसिड आणि फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास मदत करतात. यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म  रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)