राजस्थानी लसूण चटणी हिवाळ्यात ठरेल फायदेशीर, जाणून घ्या सोपी Recipe

Rajasthani Lehsun Chutney Recipe: तुम्हाला वेगेवेगळ्या पद्धतीच्या चटण्या खाण्याची आवड असेल तर तुम्ही आवर्जून राजस्थानी लसूण चटणी ट्राय करा.

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 7, 2024, 03:05 PM IST
राजस्थानी लसूण चटणी हिवाळ्यात ठरेल फायदेशीर, जाणून घ्या सोपी Recipe  title=
Photo Credit: Freepik

How to Make Rajasthani Lehsun Chutney: चटणी हा भारतीय आहारातच अविभाज्य भाग आहे. अनेकांचे जेवण चटणीशिवाय पूर्ण होत नाही. चटणी जेवणाची चव दुप्पट करते. सहसा, शेंगदाणे, टोमॅटो आणि हिरव्या मिरचीची चटणी बनवली जाते. पण तुम्ही कधी राजस्थानची प्रसिद्ध लसूण चटणी चाखली आहे का? तिखट आणि लसूण घालून बनवलेली ही चटणी खूपच टेस्टी लागते. याशिवाय ही चटणी हिवाळ्यात फायदेशीर आहे. राजस्थान व्यतिरिक्त ही चटणी आता देशाच्या इतर भागातही खाल्ली जाते. तुम्हालाही ही स्वादिष्ट चटणी चाखायची असेल, तर तुम्ही या सोप्या रेसिपीने तयार करू शकता.

लागणारे साहित्य

  • 10-12 लसूण पाकळ्या
  • 4-5 सुक्या लाल मिरच्या
  • १ मध्यम चिरलेला टोमॅटो
  • 1 टीस्पून जिरे
  • 1 टीस्पून कोथिंबीर
  • 2-3 चमचे तेल
  • चवीनुसार मीठ
  • ½ टीस्पून लाल तिखट (ऐच्छिक)
  • 1 टीस्पून लिंबाचा रस (पर्यायी)

जाणून घ्या कृती 

  • सगळ्यात आधी लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या. 
  • यानंतर कोरड्या लाल मिरच्या गरम पाण्यात 10-15 मिनिटे भिजवाव्यात जेणेकरून त्या मऊ होतील.
  • आता एक कढई मध्यम आचेवर गरम करून घ्या. त्यात जिरे आणि धणे घालून छान सुगंध येईपर्यंत परतून घ्या. परतून झाल्यावर थंड होऊ द्या.
  • पुढे भाजलेले जिरे आणि धणे यांची मिक्सरमध्ये छान बारीक पावडर करा.
  • यानंतर कढईत तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या टाका आणि छान सोनेरी होईपर्यंत लसूण परतून घ्या. 
  • यानंतर भिजवलेल्या लाल मिरच्या आणि चिरलेला टोमॅटो त्यात घाला. टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि तेल वेगळे होईपर्यंत शिजवा.
  • ते वेगळे झाले की त्यात भाजलेले जिरे आणि धणे पूड, चवीनुसार मीठ आणि तिखट घाला. सर्व साहित्य छान मिसळून घ्या आणि 1-2 मिनिटे शिजवा.
  • आता हे मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सरमध्ये याला घट्ट वाटून घ्या. आवश्यक असल्यास,  त्यात थोडे पाणी किंवा तेल घालू शकता.
  • अशाप्रकारे राजस्थानी लसूण चटणी तयार आहे. तुम्ही भाकरी, चपाती, पराठा किंवा पकोडा सोबत ही चटणी सर्व्ह करू शकता.