हिवाळ्यात वीज बिल निम्म यावं असं वाटत असेल तर असा करा फ्रिजचा वापर?

How to Save Electricity Bill : वीज बिल जास्त आल्यामुळे अनेकदा कुटुंबाच बजेट कोलडमत. अशावेळी हिवाळ्यात वीज बिल कमी येण्यासाठी फ्रिजचा वापर विशिष्ट पद्धतीने वापरल्यास नक्कीच फरक पडेल. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 11, 2024, 04:38 PM IST
हिवाळ्यात वीज बिल निम्म यावं असं वाटत असेल तर असा करा फ्रिजचा वापर? title=

घरातील फ्रिज हे इतर उपकरणांपेक्षा सर्वात जास्त वापरला जाणारी इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे. अशावेळी फ्रिजला एनर्जी इफिशिएंट बनवून ठेवण्यासाठी बजेट आणि पर्यावरण या दोन्हीचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. येथे दिलेल्या टिप्सनुसार जर तुम्ही हिवाळ्यात फ्रिजचा वापर केलात तर वीज बिल नक्कीच कमी येईल. 

कशी कराल विजेची बचत? 

  • बऱ्याच वेळा तुम्ही रेफ्रिजरेटरचा दरवाजा उघडा ठेवता ज्यामुळे सर्व थंड हवा बाहेर पडते आणि सर्व गरम हवा आत येते. त्यामुळे रेफ्रिजरेटरचा दरवाजा उघडा ठेवू नये हे लक्षात ठेवा.
  • रेफ्रिजरेटरचे दार उघडे ठेवून जेवढा कमी वेळ तुम्ही अन्न शोधण्यात घालवाल, तितके कमी काम कंडेन्सरला तापमान परत सेट पातळीवर आणण्यासाठी करावे लागेल.
  • फ्रीजमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त सामान भरू नका. जेणेकरुन रेफ्रिजरेटर सहजपणे हवा बाहेर काढू शकेल.
  • कंप्रेसर ओव्हरलोड होऊ नये म्हणून अन्नपदार्थ झाकून ठेवा. त्याच वेळी, आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये खूप गरम अन्न ठेवू नका, यामुळे आतील तापमान वाढते. उरलेले अन्न नेहमी खोलीच्या तापमानावर आल्यानंतरच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
  • रेफ्रिजरेटरची कंडेन्सर कॉइल अंतर्गत तापमान थंड ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते कालांतराने त्यांच्यामध्ये घाण जमा होऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांना स्वच्छ ठेवल्यास कंडेन्सरवरील दाब कमी होईल आणि फ्रीजचे जीवन चक्रही वाढेल.
  • तुमच्या डिव्हाइसमध्ये पॉवर सेव्हर मोड किंवा व्हेकेशन मोड असल्यास, ते वापरा. तथापि, हे वैशिष्ट्य सर्व रेफ्रिजरेटरमध्ये उपलब्ध नाही.
  • फ्रिजच्या तापमानाचा अगोदरच सेट करा. कारण योग्य तापमान असेल तर ऊर्जेचा वापर कमी यहोतो. आणि पर्यायी त्याने बील देखील कमी येते. 
  • वेंटिलेशनची विशेष काळजी घ्या. फ्रिजला नीट जागा असेल तर त्याचा प्रमाण वीज बिलावर होतो. वेंटिलेशन ब्लॉक न झाल्यामुळे ओवरहिटिंगपासून फ्रिजचा बचाव करु शकता. ज्यामुळे वीज बिल कमी होते. 
  • फ्रीजरमध्ये जमा झालेले बर्फ दर दोन-तीन महिन्यांनी कमी करा. बर्फ फक्त 2 मिमीपर्यंत असल्यास वीज बिलावर परिणाम होत नाही. पण त्यापेक्षा जास्त आल्यास 10% वीज बिलावर परिणाम होतो. रेफ्रिजरेटरमागची धूळ देखील नियमित साफ करा.