विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आल्या आहेत. दिवाळीच्या सणात निवडणुकांची लगबग पाहायला मिळतेय. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात निवडणूक असणार तर 24 नोव्हेंबरला याचा निकाल जाहीर होईल. या सगळ्यात सध्या नेते मंडळी आपला AB फॉर्म भरणं तर कुणी पक्षप्रवेश आणि सभा या सगळ्यांमध्ये व्यस्त आहे. असं असताना नातवंड सभा आणि भाषणांमध्ये भावनिक टच किंवा कौटुंबिक टच कसा येईल याचा विचार करतात. या सगळ्यात नेते मंडळींची नातवंड चर्चेचा विषय आहेत. या नेते मंडळीच्या नातवंडांची नावे आणि अर्थ पाहूया.
अनिल देशमुख यांच्या मुलाचे नाव सलील देशमुख असं आहे. तर अनिल देशमुख यांच्या नातीचं नाव सारा देशमुख असं आहे.
सलील - सलील या नावाचा अर्थ आहे. सलील हे नाव अतिशय लोकप्रिय असं नाव आहे. या नावाचा अर्थ आहे देखणा, सुंदर. या नावाचा अर्थ खूप खास आहे. मुलासाठी नाव निवडत असाल तर या नावाचा नक्की विचार करा.
सारा - सारा हे अनिल देशमुख यांच्या नातीचं नाव आहे. या नावात खूप मोठा अर्थ दडला आहे. राजकुमारी, थोर स्त्री, मौल्यवान, दृढ, शुद्ध, उत्कृष्ट, सुगंधा, राजकुमारी असा या नावाचा अर्थ आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नातवंडाच नाव आहे. अधिराज - अधिराज अष्टनकर असं नाव आहे. अधिराज या नावाचा अर्थ आहे राजा. जो अधिराज्य गाजवतो तो असा देखील याचा अर्थ आहे. अधिराज हा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलीच्या मुलाचं नाव आहे.
काव्या - काव्या हे बावनकुळे यांच्या नातीचे नाव आहे. काव्या या नावाचा अर्थ आहे. कविता, भावनेसह समृद्ध अशी ती, मूल्य, शिकणारी, दूरदृष्टी, ऋषी. काव्या हे नाव अतिशय गोड असं आहे.
राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यंदा माहीममधून मनसेकडून उमेदवार म्हणून चर्चेत आहे. अमित ठाकरे यांनी सोमवारी AB फॉर्म भरला आहे. यावेळी राज ठाकरे यांचा नातू कियान ठाकरे देखील पाहायला मिळाला. कियान नावाचा अर्थ आहे. देवाची कृपा, प्राचीन किंवा दूरची असा या नावाचा अर्थ आहे.