Marriage vs Wedding: भारतात प्रत्येक सणाचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सण किंवा समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यातील एक समारंभ म्हणजे विवाहउत्सव. भारतात लग्नसमारंभ अगदी थाटात केला जातो. यासाठी लोक लाखो रुपयांचा खर्च करतात. यासाठी दाग-दागिने, कपडेलत्ते तसंच, विविध प्रकारच्या खरेदीची सुरुवात केली जाते. हल्ली इंग्रजीत लग्नसोहळ्याची निमंत्रण पत्रिका छापली जाते. तेव्हा या पत्रिकेवर Wedding किंवा Marriage Ceremony असं लिहलं जातं. पण तुम्हाला या दोघांचा खरा अर्थ माहितीये का? तुम्ही देखील Wedding आणि Marriage याचा एकच अर्थ घेत असाल तर तुम्ही चुकताय, आज आपण जाणून घेऊया या दोन्ही शब्दांचा अर्थ
मॅरेज आणि वेंडिगमध्ये नेमका काय फरक असतो हे अनेकांना माहिती नसते. आज आपण यातीलच नेमकं अंतर काय असतं हे जाणून घेऊया. अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की आज मी याच्या वेडिंगला गेली होती किंवा अनेकदा तुम्हीही कोणाला मॅरेज अॅनिव्हर्सीच्या शुभेच्छा दिल्या असतील. पण खरं तर या दोन्ही शब्दांचे वेगवेगळे अर्थ आहेत. जाणून घेऊया याचे नेमके अर्थ.
तज्ज्ञांच्या मते, मॅरेज म्हणजे कोणताही समारंभ नाही तर दोन व्यक्तींमधील नाते असते. जे आयुष्यभर निभवावे लागते. विवाहाच्या माध्यमातून पती आणि पत्नींमध्ये एक नातं तयार होतं. यालाच मॅरेज असं म्हणतात. त्यामुळं जर तुम्ही असं म्हणात असाल की मी मॅरेजला जात आहे, तर ते चुकीचे आहे.
वेडिंग काय असते हे आपण जाणून घेऊया. मॅरेज म्हणजेच विवाहाचे सर्व विधी व प्रथा पूर्ण केल्या जातात. यालाच वेडिंग असं म्हणतात. विवाहाचे विधी आणि त्यासाठी नातेवाईकांना आमंत्रित करुन सोहळा केला जातो याला वेडिंग असं म्हटलं जातं. या सोहळ्यात वधु आणि वरांना मोठ्यांचे आशीर्वाद मिळतात.
लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर लोक लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. काही जण हॅपी वेडिंग किंवा हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी असं म्हणत दाम्पत्याला शुभेच्छा देतात. पण यांपैकी नेमकं काय म्हणायचं हे जाणून घ्या. लग्न झाल्यानंतर जोडप्याला हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी असाच मेसेज करा. कारण वेडिंग म्हणजे ज्यात सर्व विधी नातेवाईकांच्या साक्षीने पूर्ण करुन जोडपं विवाहबंधनात अडकलं आहे.