मुंबई : औरंगाबादमध्ये सध्या कोरोनानं चांगलंच थैमान घातले आहे. ३० मार्चला तब्बल 43 जणांनी जीव गमावला. धक्कादायक बाब म्हणजे त्यामध्ये एका 29 दिवसांच्या बाळाचाही समावेश होता. त्याशिवाय आणखी एक 6 महिन्यांची चिमुकली कोरोनाने दगावली. तर एका 14 वर्षांच्या मुलाचा देखील कोरोनाने बळी गेलाय.
त्यामुळे पालकांनी मुलांच्या आजाराकडं दुर्लक्ष करू नये. वेळीच कोरोना टेस्ट करून घ्या, असं आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांनाही बसू लागला आहे. बंगळुरूत दहा वर्षांखालील 472 मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. नजीकच्या भविष्यात हे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या चिमुकल्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
काय काळजी घ्याल?
1. लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका.
2. त्यांना मास्क, सॅनिटायझर तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं महत्व समजावून सांगा.
3. बाहेरून आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यास सांगा.
4. मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ देणे टाळा.
5. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कोरोना आता तुमच्या चिमुकल्यांपर्यंत येऊन पोहोचलाय. त्यामुळे आतापासूनच काळजी घ्या. कारण संसर्ग होण्यापूर्वीच खबरदारीचा उपाय आखणे कधीही चांगलेच