महिलांसाठी असलेल्या विशाखा समित्यांचं काय झालं ? धक्कादायक वास्तव समोर

 विशाखा समिती ही प्रभावीपणे काम करत नसल्याचे स्पष्ट

Updated: Mar 31, 2021, 06:05 PM IST
महिलांसाठी असलेल्या विशाखा समित्यांचं काय झालं ? धक्कादायक वास्तव समोर  title=

मुंबई : दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर (Deepali Chavan Sucide) महिलांसाठी काम करणाऱ्या विशाखा समित्यांच्या कामाची पाहणी करण्यात आली. यातून धक्कादायक वास्तव समोर आलंय. अनेक कार्यालयात विशाखा समिती (Vishakha  Committee) ही प्रभावीपणे काम करत नसल्याचे स्पष्ट झालंय. त्यामुळे महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना कश्या रोखायच्या  ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. 

विशाखा समितींचा (Vishakha  Committee) आढावा घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाने(Women And Child Welfare) टास्क फोर्सची स्थापना केली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण तसंच त्रासाची दखल घेण्यासाठी कार्यालयांमध्ये विशाखा समित्यांची स्थापना करण्यात येते.या समित्यांच्या कामाचा महिला व बालकल्याण विभाग आढावा घेत आहे. 

अनेक ठिकाणी या समित्या कार्यरत आहेत मात्र प्रभावी नसल्याचे आढळून आले आहे. या कमिट्यांवर वचक असावा यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली गेली. अनेक ठिकाणी टास्क फोर्स अचानक भेटी देणार आहे. 

तुमच्या आसपास अशा घटना घडत असतील तर तात्काळ त्या निदर्शनास आणण्याचे  आवाहन महिला व बालकल्याण विभागाने केले आहे.