मागण्या मान्य करा अन्यथा; सरकारी कर्मचारीही निघाले संपावर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हैराण असलेल्या राज्य सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी दिलाय.

Updated: Feb 9, 2022, 04:51 PM IST
मागण्या मान्य करा अन्यथा; सरकारी कर्मचारीही निघाले संपावर title=

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हैराण असलेल्या राज्य सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी दिलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या विविध मागण्यांबाबत सरकारी कर्मचाऱ्यांनी पत्र दिले आहे. या मागण्या मान्य केल्या नाही तर संपावर जाण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय.   
 
आपल्या विविध २८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी तृतीय, चतुर्थ श्रेणी अशा १७ लाख कर्मचार्‍यांनी संपाची हाक दिलीय. २३ आणि २४ फेब्रुवारीला हे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

काय आहेत मागण्या 
- निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे
- जुनी पेन्शन योजना लागू करणे
- रिक्त पदे भरणे
- अनुकंपा तत्त्वाची पदे भरा
- केंद्र सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे वाहतूक, शिक्षण, प्रवास भत्ता मिळावा