अकोला : अकोल्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायी अमित वाघ त्यांच्या कुटुंबीयांसह साताऱ्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची पत्नी प्रियंका व दोन मुले स्पंदन व शाश्वत बेपत्ता झाले आहेत. सातारा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अमित वाघ यांचे संपूर्ण कुटुंबीय अशाप्रकारे अचानकच बेपत्ता झाल्याने बांधकाम व्यवसायाच्या स्पर्धेतून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अमित वाघ हे अकोल्यातील खडकी येथील संतोषनगरात भागात राहतात. ते सातारा येथे १३ जूनच्यापूर्वी सुट्यांमध्ये गेले होते. अमित वाघ यांची सातारा ही अमित वाघ यांची सासरवाडी असल्याची माहिती आहे. १३ जूनच्या रात्रींपासून अमित वाघ आणि त्यांचे कुटुंबीय अचानक बेपत्ता झाले. त्यांचा सातारा पोलीस कसून शोध घेत आहेत. अमित वाघ यांची पत्नी आणि दोन मुलेही बेपत्ता झाली आहेत.
वाघ यांचे अकोल्यातील गोरक्षण रोड, मलकापूर, तुकाराम हॉस्पिटल चौकामध्ये मोठ-मोठी अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. तर काही बांधकाम पूर्णत्वास गेलेली आहेत. ते अशाप्रकारचे अचानक बेपत्ता झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.