औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये सराफावर गोळीबार करुन दुकान लुटल्याची घटना घडलीय. सोनार आपलं दुकान बंद करुन दुचाकीवरुन जात असताना दोन दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यावर बंदूक रोखून बेदम मारहाण केली. १२ तोळे सोनं, एक किलो चांदी आणि रोख 90 हजार रुपये असा एकूण अंदाजे पाच लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला.
दरम्यान, याचवेळी रस्त्यावरुन जाणा-या एका मोटारसायकलस्वारानं सोनाराला मदत करण्याचा प्रयत्न केला असता. या दरोडेखोरांनी त्याच्यावरही गावठी बंदूकमधून गोळ्या झाडल्या. ही घटना औरंगाबाद -जळगाव महामार्गावरील गोळेगावमध्ये घडली. या घटनेत सोनारासह दोन जण जखमी झाले.