अमर काणे, नागपूर : वनविभागाने कोट्यवधी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी अर्थात अंबरग्रीस जप्त केलंय. याप्रकरणी नागपुरात चार तस्करांना वनविभागाने सापळा रचून ताब्यात घेतलंय. नागपुरात पकडण्यात आलेल्या अंबरग्रीसची किंमत कोट्यावधी रुपयांची असण्याची शक्यता आहे. अंबरग्रीस प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना नागपुरात व्हेल माशाची उलटीची तस्करी करणारी टोळी नागपुरात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वनविभागाने सापळा रचून नागपुरात शहरातल्या गणेशपेठ परिसरातून प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं. अरुण गुंजाळ, पवन गजघाटे, राहूल दुपारे आणि प्रफुल्ल मतलाने या चार जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दुर्मिळ अस अंबरग्रीस जप्त करण्यात आलंय.
आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तस्करांची चौकशी केली असता या प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असण्याचे तपासात समोर येतंय. वनविभागाने त्यांच्याकडून जप्त केलेले अंबरग्रीस कोट्यावधी रुपयांचं आहे. नागपुरात ही अशा प्रकारची पहिलीच कारवाई असून या मागे हे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे.
अंबरग्रीस अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत कोट्यावधीत आहे. याला समुद्रातील सोनं किंवा तरंगणारं सोनं असेही म्हणतात. महागडे परफ्युम्स आणि औषधांसाठी अंबरग्रीसचा खास करून वापर करण्यात येतो.
अंबरग्रीस परफ्युमचा सुगंध हवेत उन्हापासून रोखण्याचं काम करतो. शरीरातून बाहेर पडल्यानंतर उलटी समुद्राच्या पाण्यात तरंगत असते सूर्यकिरण आणि समुद्रातील शार यांच्या मुळे रासायनिक प्रक्रिया होऊन याचे स्वरूप अंबरग्रीसमध्ये होतं.