सातारा : साता-यातील अजिंक्यतारा किल्ल्याजवळ झालेल्या अपघातात 20 पर्यटक जखमी झालेत. अजिंक्यतारा किल्ला पाहून खाली येत असताना त्यांच्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यावेळी चालकानं कसंबसं नियंत्रण राखत, रस्त्याच्या बाजूला बस दाबल्यानं ती दरीत कोसळली नाही... त्यामुळं मोठा अनर्थ टळला.
या अपघातात जखमी झालेले सगळे पर्यटक वसईचे रहिवासी आहेत. जखमींवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणा-या दुर्गप्रेमींनी या अपघातग्रस्तांना बसबाहेर काढण्यास मदत केली.