औरंगाबाद : Political News : औरंगाबादमध्ये (Aurangabad) जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. (Chief Minister Uddhav Thackeray made a big statement) व्यासपीठावरचे आजी माजी सहकारी आणि भविष्यातील सहकाऱ्यांचं स्वागत असं विधान केले आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला एकाच मंचावर सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना टोले लगावले.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही व्यासपीठावरचे माझे आजी माजी सहकारी, आणि भविष्यात पुढं पुन्हा एकत्र आले तर भविष्यातील सहकारी सगळ्यांचे स्वागत असं म्हणत भाषणाला सुरूवात केली. त्यावेळी मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेत असाल तर सरकार तुमच्या सोबत असल्याचाही शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांना या विधानामधून शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचेच तर संकेत द्यायचे नव्हते ना? याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे.