पिंपरीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अभूतपूर्व गोंधळ

पिंपरी-चिंचवड मध्ये आज प्रस्तवित रिंग रोड बधितांच्या संयमाचा बांध फुटला आणि शहराने अभुतपूर्व संघर्ष अनुभवला...शहरात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा कार्यक्रम होता...त्यावेळी रिंग रोड बाधित मुख्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी करत होते ,पण त्यांची मागणी पूर्ण झाली नाही आणि आंदोलकांनी प्रचंड गोंधळ केला.

Updated: Aug 12, 2017, 08:40 PM IST
पिंपरीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अभूतपूर्व गोंधळ title=

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड मध्ये आज प्रस्तवित रिंग रोड बधितांच्या संयमाचा बांध फुटला आणि शहराने अभुतपूर्व संघर्ष अनुभवला...शहरात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा कार्यक्रम होता...त्यावेळी रिंग रोड बाधित मुख्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी करत होते ,पण त्यांची मागणी पूर्ण झाली नाही आणि आंदोलकांनी प्रचंड गोंधळ केला.

पोलिसांना बळाचा वापर करत आंदोलकांना पंगावावे लागले...! प्रस्तवित रिंग रोड मुळे हजारो घरे तुटणार आहेत ,त्यामुळे रिंग रोड बधित गेली दोन महिने विविध माध्यमातून आंदोलन करत आहेत...! आज मुख्यमंत्री येणार म्हणून शेकडो नागरिक मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी आले...पण त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेटच होऊ दिली गेली नाही.

मुख्यमंत्री येण्यापूर्वी अक्षरशः एका मंगल कार्यालयाच्या पटांगणात त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले...मुख्यमंत्री भेठतील या आशेने नागरिक शांत बसले, पण उद्घाटनांचा कार्यक्रम झाला आणि मुख्यमंत्री निघून ही गेले, त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी प्रचंड गोंधळ केला..आंदोलक पोलिसांशी भिडले...पोलिसांनी काही आंदोलकांवर लाठीचार्ज केला तर काही ठिकणी बाळाचा वापर केला...तब्बल दीड तास हा संघर्ष चालू होता...ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप आंदोलकांनी केला...!  

मुळात रिंग रोड बधितांचा घरे जाणार आहेत त्यामुळे त्यांच्यात प्रचंड संताप आहे..त्यातच सत्ताधारी भाजप या प्रश्नाला अतिशय निष्काळजीपणाने हाताळत आहे...आणि आज तर भेटच झाली नाही त्यामुळंब हिंसाचार झाला.