'मी ऑफिसला पोहोचलोय गं...' पत्नीला अखेरचा मेसेज करून बँक अधिकाऱ्याची Atal Setu वरून उडी

Mumbai News : बापरे.... कामाच्या ताणामुळं उचललं टोकाचं पाऊल? CCTV फुटेजमुळं समोर आलं सत्य.... नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर वृत्त   

सायली पाटील | Updated: Oct 1, 2024, 08:03 AM IST
'मी ऑफिसला पोहोचलोय गं...' पत्नीला अखेरचा मेसेज करून बँक अधिकाऱ्याची Atal Setu वरून उडी  title=
Mumbai news man jumps off from Atal Setu latest news

Mumbai News : (Mumbai and Navi Mumbai) मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या आणि प्रवासातील वेळीची मोठ्या प्रमाणात बतच करणाऱ्या अटल सेतूची चर्चा असते खरी. यावेळी मात्र ही चर्चा आणखी एका नकारात्मक घटनेमुळं सुरु असून, इथून एका बँक अधिकाऱ्यानं उडी मारून आयुष्य संपवल्याची घटना समरो आल्याचं वृत्त आहे. 

उपलब्ध माहितीनुसार कुटुंबासमवेत दोन दिवस लोणावळा इथं जाऊन सुट्टीचा आनंद घेऊन आलेल्या एका व्यक्तीनं हे टोकाचं पाऊल उचललं. ही व्यक्ती राष्ट्रीय स्तरावरील बँकेत विमा विभागात उप व्यवस्थापक म्हणून काम पाहत होती. सोमवारी अटल सेतू इथून त्यांनी समुद्रात उडी मारत आयुष्य संपवलं. दरम्यान मृत व्यक्तीसंदर्भता पोलीस अधिक तपास करत असून अद्यापही त्यांचा मृतदेह हाती लागला नसल्याचं म्हटलं जात आहे. 

फोर्टस्थित एका बँकेत नोकरी करणाऱ्या या कर्मचाऱ्याचं नाव सुशांत चक्रवर्ती असं सांगण्यात येत आहे. पत्नी, 7 वर्षांची मुलगी आणि पत्नीची आई असं त्यांचं कुटुंब असून, परळ गावात ते वास्तव्यास असल्याचं सांगितलं जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळं चक्रवर्ती यांच्या आत्महत्येती माहिती मिळू शकली. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार त्यांनी हे पाऊल उचलण्याआधी पत्नीला मेसेज केला. 

'मी ऑफसला पोहोचलोय गं...' असं त्यांनी पत्नीला कळवलं. ज्यावर पत्नीनंही आपण पालक सभेसाठी मुलीच्या शाळेत आल्याचं सांगितलं. पण, पत्नीच्या या मेसेजवर मात्र त्यांचं काही उत्तर आलं नाही. पोलिसांनीच काही वेळानंतर पत्नीला सदर घटनेबाबत माहिती दिली. ज्यानंतर पत्नीकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशांत यांना कामाच्या ठिकाणी प्रचंड ताण असल्यामुळे ते प्रचंड तणावाचा सामना करत होते, अशी बाब समोर आली. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी होताच तापमानात वाढी; लक्षपूर्वक वाचा हवामान वृत्त... 

दरम्यान CCTV फुटेजनुसार सोमवारी सकाळी चक्रवर्ची यांनी नोकरीवर जाणअयाच्या निमित्तानं घर सोडलं आणि ते अटल सेतूवर पोहोचले. तिथे कर्मचारी दिसल्याने त्यांनी कार पुढे आणली आणि ते परत आले. अधिकृत माहितीनुसार सकाळी 9 वाजून 57 मिनिटांनी त्यांनी समुद्रात उडी घेतली. पोलिसांना घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लाल रंगाची मारुति ब्रेझा ही कार हाती लागली. अटल सेतूवर घडलेली ही पहिलीच घटना नसून, याआधीही अशा काही घटना समोर आल्या होत्या.