दानवे, खोतकरांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

दानवे, खोतकर या दोघांवर निवडणूक लढवायला बंदी घाला, अशी लेखी तक्रार संभाजी ब्रिगडने निवडणूक आयोगाकडे केली आहे.  

Updated: Mar 12, 2019, 07:06 PM IST
दानवे, खोतकरांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार title=

जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर या दोघांनीही एकमेकांवर जाहीरपणे आरोप केलेत. मात्र त्यांनी एकमेकांविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्राही दाखल केलेल्या नाहीत. जोपर्यंत दानवे, खोतकर एकमेकांवरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करत नाही. तोपर्यंत दोघांवरही निवडणूक लढवायला बंदी घाला अशी लेखी तक्रार संभाजी ब्रिगडने निवडणूक आयोगाकडे केली आहे. जालना येथून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. या दोघांनीही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. खोतकर आणि दानवे दोघंही भ्रष्टाचारी आहेत. दोघेही एकमेकांचा भ्रष्टाचार सिद्ध करत नाही, तोपर्यंत दोघांवरही निवडणूक लढवायला बंदी घाला, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करुन केली आहे. 

खोतकर आणि दानवे या दोघांनीही एकमेकांवर जाहीरपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पण कोठेही एकमेकांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराच्या तक्रारी केल्याचं निदर्शनास आलेले नाही. या दोघांना आणखी निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास दोघंही भामटेपणा करून आणखी भ्रष्टाचार करतील. त्यामुळे हे नेते एकमेकांचा भ्रष्टाचार सिद्ध करत नाही. तोपर्यंत दोघांवरही निवडणूक लढवायला बंदी घाला, अशी लेखी तक्रार संभाजी ब्रिगेडने निवडणूक आयोगाकडे केली आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही तक्रार करण्यात आली असून निवडणूक आयोगाला देखील या तक्रारीचा मेल करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडने निवडणूक आयोगाकडे केलेल्या या तक्रारीमुळे जालना शहरात एकच चर्चा सुरु आहे.