राज्यात कृषी कायदा करण्याची कॉंग्रेसची मागणी

 केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली आणि अद्यापही सुरु आहेत.  

Updated: Nov 7, 2020, 07:54 AM IST
राज्यात कृषी कायदा करण्याची कॉंग्रेसची मागणी  title=

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणार्‍या काँग्रेसने महाराष्ट्रात कृषी कायदा करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याबाबतच्या मागणीचे निवेदन त्यांच्याकडे दिले आहे. 

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. देशातील काँग्रेस शासित राज्यांनी असा कायदा केला आहे. 

महाराष्ट्रातही हा कायदा लवकर व्हावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या कायद्यामध्ये शेतमाल खरेदीच्या व्यवहारासाठी किमान आधारभूत किंमत अनिवार्य करण्यासह शेतकरीहिताच्या विविध तरतुदींचा समावेश असावा, असे काँग्रेसच्या या निवेदनात म्हटले आहे.