चिंताजनक | दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या नागिरकाला कोरोना, यंत्रणा सतर्क

 जगावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संकट घोंगावतंय. 

Updated: Nov 30, 2021, 07:11 PM IST
 चिंताजनक | दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या नागिरकाला कोरोना, यंत्रणा सतर्क  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : जगावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron Varient) संकट घोंगावतंय.  त्यामुळे राज्य सरकार (Maharashtra Government) सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नवी नियमावलीही जाहीर केली आहे. दरम्यान आता राज्यातील जनतेसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकाचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. (corona infection in a citizen from who come to south africa to pune) 

दरम्यान या व्यक्तीला ऑमायक्रॉन या नव्या विषाणूची लागण झालेली आहे की नाही, हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावी लागणार आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दिलासादायक बातमी म्हणजे या व्यक्तीच्या कुटुंबियांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. दरम्यान आता आरोग्य विभागाचं लक्ष हे जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीचा अहवाल काय येतो, याकडे लागून राहिलं आहे.