औरंगाबाद : या शेतकरी कन्या आज चर्चेत आहेत, त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. या मुलींची जेमतेम आर्थिक परिस्थिती, शेतीची कोळपणी करायला पैसे नव्हते, म्हणून थेट कोळपणी यंत्राचाच शोध लावला. अवघी ३० गुंठे जमीन होती, तेव्हा पैसे न दवडता, त्यांनी शेतीच्या कोळपणीसाठी उपाय शोधून काढला आहे. ज्योती आणि स्वाती यांनी असा शोध लावून कोळपणीचं काम केलं आहे.
या शेतकरी कन्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे, इतरांकडून बैलजोडी एका दिवसासाठी भाड्याने आणली तरी पैस देण्यास त्यांच्याकडे पैसे नसल्याने, त्यांनी हा उपाय केला आहे.ज्योती आणि स्वाती यांनी आपल्या आईवडिलांचे देखील श्रम वाचवले आहेत. जुन्या सायकलीच्या चाकांचा वापर करून त्यांनी कोळपणी यंत्र तयार करून घेतले आहे.