नाशिकमध्ये मुलींच्या वसतिगृहात तरुणीची आत्महत्या

समाजकल्याण विभागातील मुलींच्या वसतिगृहात गौरी जाधव या मुलीने आत्महत्या केलीय. गळफास घेऊन गौरीनं जीवनयात्रा संपवली. 

Surendra Gangan Updated: Mar 23, 2018, 04:21 PM IST
नाशिकमध्ये मुलींच्या वसतिगृहात तरुणीची आत्महत्या title=

नाशिक : समाजकल्याण विभागातील मुलींच्या वसतिगृहात गौरी जाधव या मुलीने आत्महत्या केलीय. गळफास घेऊन गौरीनं जीवनयात्रा संपवली. 

 पोलीस घटनास्थळी

गौरी मूळची औरंगाबाद येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असले तरी कोणतीही माहिती अजून पोलीस देत नाही. 

वसतिगृहात प्रवेश नाकारला!

मुलीने आत्महत्या केली असली तरी कोणत्या कारणाने आत्महत्या केली आहे हे अजून अस्पष्ट आहे. वसतिगृहात कुणालाही परवानगी नसल्याचे सांगत वसतिगृहात प्रवेश दिला जात नाही. पोलीस आणि वसतिगृहातील कर्मचारी घटनेची कुठलीही माहिती देत नाहीत.