Gold Price Today Latest News in Marathi: सध्या सुरु असलेल्या लग्नसराईमुळे सोनं आणि चांदीच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. सोनं आणि चांदी यांच्या वाढत्या मागणीमुळे दरातही गेल्या महिन्याभरापासून दिवसेंदिवस वाढ होताना दिसत होती. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतं आहे. आज (22 एप्रिल 2024) सोनंच्या दरात 630 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1130 रुपयांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
इराण आणि इस्त्राईल यांच्यातील युद्धानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सोनं आणि चांदीने मोठी उडी घेतली आहे. सध्या सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाल्याने ग्राहकांना मोठी झळ बसत असून आज, सोमवारी भारतीय सराफ बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 66,321 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72,350 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीचा आजचा दर 82,800 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला आहे.
तर जागतिक बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली जात आहे. COMEX वर सोन्याची किंमत प्रति ऑन $ 2384 वर व्यापार करत आहेत. तर चांदीची किंमत देखील प्रति ऑन $28.07 वर व्यवहार करत आहे. यापूर्वी इराण आणि इस्रायल तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीत वाढ होत होती.
तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सध्या सोन्याचा भाव 0.83 टक्क्यांच्या घसरणीसह 72,200 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे. म्हणजेच 606 रुपयांची घसरण झाली. तर चांदीची किंमत 1.33 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे, म्हणजेच 1107 रुपयांची घसरण होऊन 82,400 रुपये प्रति किलोने खरेदी केली जात आहे.
जून महिन्यात सोन्या-चांदीचे दरात घसरण होण्याची शक्यता आहे. केडिया ॲडव्हायझरीच्या मते, सोन्याचे दर सध्याच्या पातळीपासून 6000 ते 7000 रुपयांनी घसरू शकते. जून महिन्यात होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयामुळे सोन्याचे भाव घसरण्याची किंवा वाढण्याची शक्यता आहे. तसेच रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यानंतर आता इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सोनं चांदीच्या दरवाढीवर दिसून येत आहे. या तीन महिन्यांत सोन्याच्या किमतीत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 74 हजार रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. विश्लेषकांच्या मते, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाने जागतिक स्तरावर मोठ्या हालचाली निर्माण केल्या आहेत. त्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडला आहेत.