HSC Exam 2023 Admit Cards : बारावीच्या परीक्षांची (HSC Exam 2023) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीची परीक्षा (hsc exam hall ticket 2023) मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 मार्च 2023 या काळात होणार आहे. त्यासाठी हॉल तिकिट्सची गरज असते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनो तुमच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज महाराष्ट्र स्टेट बर्ड बारावीची परीक्षा (www.mahahsscboard.in) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स उपलब्ध होणार आहे.
आज सकाळी 11 वाजतापासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकिट्स उपलब्ध असणार आहेत. याशिवाय www.mahahssscboard.in या वेबसाईटवर तुम्हाला प्रवेशपत्रं मिळू शकतं.
प्रवेशपत्र मिळाल्यावर त्याची प्रिंट काढा. याशिवाय हे प्रवेशपत्र नीट तपासा. तुमचे विषय आणि माध्यम नीट बघा. यात काही चूक असल्यास काळजी करण्याची गरज नाही. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन तुम्ही ही चूक दुरुस्त करु शकतो. ही दुरुस्तीकडून नती प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे. (hsc exam 2023 maharashtra state board admit cards available today 27 January 2023 Pariksha Pe Charcha 2023 marathi news)
दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्र महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते जपून ठेवा. जर ते गहाळ झाल्यास घाबरण्याचं काम नाही. अशावेळी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा 'प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा लिहून विद्यार्थ्यांना दुसरं प्रवेशपत्रं मिळणार.
www.mahahsscboard.in या वेबसाईटवर आज, म्हणजेच 27 जानेवारीला सकाळी 11 वाजता हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कॉलेज लॉगइनवर देखील हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.