देवेंद्र फडणवीस यांची चौकशी आणि सुधीर मुनगंटीवार अध्यक्षांना म्हणाले, रामशात्री प्रभुणे व्हा...

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस चौकशीचे पडसाद आज  विधानसभेत उमटले. या विषयाला सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात वाचा फोडली   

Updated: Mar 14, 2022, 12:25 PM IST
देवेंद्र फडणवीस यांची चौकशी आणि सुधीर मुनगंटीवार अध्यक्षांना म्हणाले, रामशात्री प्रभुणे व्हा...  title=

मुंबई : स्थगन प्रस्ताव कसा होतो हे सांगितले पाहिजे.. आमच्या हक्काचं संरक्षण करणे हे सरकारचं दायित्व आहे.. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण सदस्याचे संरक्षण देतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भ्रष्टाचार उघड केला. 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या स्बग्रुहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. मात्र, ज्या पद्धतीने आपण काल भाष्य केलं. पण, ती तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. तुम्ही ज्येष्ठ आहेत.  पण, विरोधी पक्षनेते यांची घरी जाऊन चौकशी ही कोणत्या नियमात बसतं. 

तुम्ही अध्यक्ष असताना सदस्यांचे अधिकार यावर भाष्य केलंय. सभागृहात सदस्य जे सांगतो ते सत्य मानले पाहिजे. विरोधी पक्षनेते यांनी जे सभागृहात मांडले त्या आरोपांची चौकशी करण्याची गरज होती. मात्र, ज्यांनी आरोप केले त्याचीच चौकशी सुरु हे कसं झालं? 
  
राज्यात राजकीय सूडयंत्र सुरु झालंय का? देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले त्याची चौकशी केली पाहिजे होती पण उलट झालं. अजित दादांचे आणि आमचे वैचारिक मतभेद असतील. पण, इतके सुडाचे राजकारण आम्ही केले नव्हते.

या गंभीर विषयावरचा स्थगन प्रस्ताव फेटाळला. पण, अध्यक्ष महोदय तुम्ही रामशात्री प्रभुणे व्हा. नियम वाचा, अधिकाऱ्याना विचारा. या विषयावर चर्चा करावी. विशेष अधिकार यावर चर्चा व्हावी. कायद्याचे राज्य आणा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.