Jalgaon Train Accident : बुधवारी 22 जानेवारी 2024 ला जळगावजवळ पुष्कर एक्स्प्रेसचा विचित्र अपघात झाला. या दुर्घटनेत 13 प्रवाशांचा नाहक बळी गेला. पुष्कर एक्स्प्रेसमध्ये आग लागली अशी अफवा पसरली. म्हणून प्रवाशांनी एक्स्प्रेसची साखळी ओढली. आता प्रवाशांची ट्रेनमधून उतरण्याची घाई सुरु झाली. पण एका संकटातून वाचण्यासाठी त्यांनी एक्स्प्रेसमधून उडी मारली पण नशिबात मरणच लिहिलं होतं. दुसऱ्या ट्रॅकवरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. या गोंधळला कारणीभूत चहावाल्याची एक चूक ठरली.
पुष्पक एक्स्प्रेसमध्ये उदल कुमार (30, उत्तर प्रदेश) हे लखनऊ ते मुंबई पुष्पक एक्स्प्रेसने रोजगारासाठी मुंबईला येत होते. त्यांच्यासोबत त्यांचे मेहुणे विजयकुमारही होते. ते सर्वसाधारण तिकीटाने जनरल बोगीच्या वरच्या बर्थवर बसले होते. त्यावेळी अचानक रेल्वेच्या रसोईतील चहा विक्रेत्याने आगली लागली, आग लागली अशी आरडाओरड केली. त्याची ही आरोळी ऐकू येताच बोगीत अचानक गोंधळ उडाला. आजूबाजूच्या बोगीतही गोंधळ उडाला. यामुळे घाबरून काही प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी उड्या मारल्या.
प्रवाशांनी उड्या मारल्या तेव्हा रेल्वेचा वेग खूप जास्त होता. त्यामुळे एका प्रवाशाने साखळी ओढून रेल्वे थांबवली. त्यानंतर प्रवाशी भरभर गाडीतून खाली उतरू लागले. ते आपला जीव वाचवण्यासाठी पळत असतानाच शेजारी असणाऱ्या दुसऱ्या रुळावरून जात असलेल्या बंगळुरू - नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना उडवले. त्यानंतर ही रेल्वे काही अंतरावर जाऊन थांबली.
या धडकेने प्रवाशांची शरीराची एवढी दुर्दशा झाली होती की, ती मी सांगूही शकत नाही. या घटनेत काही प्रवाशी मृत्यूमुखी पडले, तर काही जखमी झाले. त्यात उदलकुमार आणि विजयकुमार या दोघांनाही धडक बसली आणि ते जखमी झाले. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला.
खरं तर जळगावहून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसचे अचानक ब्रेक लागल्याने चाकातून आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी डब्यात आग गाडीला आग लागल्याची चर्चा सुरू झाली. यावेळी काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.