Sharad Pawar's Retirement Announcement : राज्याच्या राजकारण मोठी घडामोड घडली आणि राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंपाचा हादरा बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आणि पक्षात एकच कल्लोळ माजला. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेत भावूक झालेत. तुम्ही बाजुला जावून आम्ही कोणीच काम करणार नाही. तुम्ही बाजुला जावून आम्ही कोणीच काम करणार नाही. तुम्ही या पदावर कायम हवे आहात, अशी साद राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पवार यांना घातली.
पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते भावूक झाले आहेत. जयंत पाटील यांच्यासह अजितदादा पवार, आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर झाले. निवृत्तीचा निर्णय मागे घ्या अशी मागणी त्यांनी केली. तुम्ही आमच्या सगळ्यांचे राजीनामे घ्या. तुम्हाला कसा पक्ष निर्माण करायचा आहे, ते तुम्ही करु शकता. पण तुम्ही बाजुला जावून आम्ही कोणीच काम करणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले. यावेळी त्यांना अश्रु अनावर झालेत. त्याचवेळी पवार यांच्याही डोळ्यात पाणी आले. सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्या पुस्तकातून पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट
आतापर्यंत महाराष्ट्रात आम्ही सगळे पवाराच्या नावाने मते मागत आलो. पक्षाला त्यांच्यामुळे मते मिळतात. आता तेच बाजुला गेले तर आम्ही कोणाला घेऊन लोकांसमोर जायचे हा आमचा पहिला प्रश्न आहे. अजुनही शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुखपदी राहणे महाराष्ट्रच नाही तर देशातल्या राजकारणासाठी, जनतेसाठी गरजेचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांकडून पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मोठा गोंधळ निर्माण झाला. जोपर्यंत शरद पवार निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही सभागृह सोडणार नाही, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. तुम्ही नसाल तर आम्ही काहीही काम करणार नाही. तुम्हाला पक्ष जसा हवा असेल तसा बनवा. आम्ही सगळे राजीनामे देतो. पण तुम्ही आम्हाडा सोडून जाऊ नका, असे भाविक आवाहन जयंत पाटील यांनी केले.
दरम्यान, त्याचवेळी अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समिती जो निर्णय घेईल तो शरद पवार यांना मान्य असणार असल्याचं स्पष्ट केले. कमिटीत बाहेरचे लोक नाहीच. समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवारच आहे. तिथे मी, सुप्रिया आणि इतर आहेत. साहेबांना तुम्ही जी काही भावनिक साद घातली आहे, ती आमच्या लक्षात आली आहे, असे अजितदादा म्हणाले.