लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल

कोकणाच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे. लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झाले आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी कोकणात पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 31, 2017, 02:45 PM IST
लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल title=

रत्नागिरी : कोकणाच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे. लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झाले आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी कोकणात पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. 

यावर्षी 31 डिसेंबरला रविवार आल्याने पर्यटकांचा ओढा जास्त आहे. गोव्याप्रमाणे कोकणात देखील आता सोयीसुविधा मिळत असल्यामुळे कोकणचे किनारे पर्यटकांनी फुलायला लागले आहेत. सिंधुदुर्गमधील मालवण, देवबाग, देवगड तसेच रायगडमधील अलिबाग, काशीद किनारे गजबजले आहेत.

रत्नागिरीतही मुरुड, हर्णे, आंजर्ले, गुहागरमधील हेदवी, वेळणेश्वर आणि गणपतीपुळे किनारे पर्यटकांनी फुलले आहेत.