U19 Womens T20 World Cup : क्रिकेट सामने सुरु असताना मैदानात साप आल्यामुळे सामना काहीकाळ थांबवण्यात आल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अशीच काहीशी घटना ही अंडर-19 महिला टी20 वर्ल्ड कप 2025 (U19 Womens T20 World Cup) मधील एका सामन्यादरम्यान घडली. मात्र मैदानात आलेल्या सापाला पाहून 18 वर्षांच्या महिला क्रिकेटरने जे काही केलं ते पाहून सर्वच शॉक झाले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयसीसी अंडर 19 महिला T20 वर्ल्ड कप 2025 सध्या मलेशियामध्ये सुरु असून 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदाच्या अंडर 19 महिला T20 वर्ल्ड कपमध्ये तब्बल 16 संघानी सहभाग घेतलाय. रविवारी एंगलण्ड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सामना पार पडला. दरम्यान सामना सुरु असताना मैदानात अचानकपणे साप शिरला. मैदानातील सापाला पाहून खेळ काहीवेळ थांबण्यात आला. साप पीच पर्यंत आला असताना इंग्लंडची 18 वर्षीय फलंदाज जेमिमा स्पँसरने धाडस दाखवून बॅटच्या हॅण्डलने सापाला मैदानातून बाहेर काढले. सापाला पाहून भलीभली लोक घाबरतात पण महिला खेळाडूने दाखवलेलं धाडस पाहून सर्वच थक्क झाले. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
इंग्लंड विरुद्ध आयर्लंड सामन्यात आयर्लंड संघाने जबरदस्त फिल्डिंग केली, परंतु पावसामुळे इंग्लंडची इनिंग पूर्ण होऊ शकली नाही. ग्रुप बी मध्ये झालेल्या या सामन्यात आयर्लंडची कर्णधार नियाम मॅकनल्टीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रात्रभर पडलेल्या पावसाने मैदान ओले झाल्याने टॉस करायला उशीर झाला होता.
हेही वाचा : बांगलादेशी प्रेक्षकांची घृणास्पद कृती...लाइव्ह मॅचदरम्यान केला हिंदू क्रिकेटरचा अपमान, Video Viral
इंग्लंडने फलंदाजीची सुरुवात चांगली केली, 20 ओव्हरमध्ये इंग्लंडच्या संघाने 7 विकेटवर 144 धावा केल्या. तर आयर्लंडने पहिल्याच ओव्हरमध्ये एकही चेंडू न खेळता एक विकेट गमावली. एलिस वॉल्शलाही केवळ 10 धावा करता आल्या. जेव्हा आयर्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा थोडावेळ पाऊस पडला, मात्र काहीवेळाने पाऊस थांबल्याने सामना पुन्हा सुरु करण्यात आला होता. पण चौथ्या ओव्हरदरम्यान पुन्हा पावसाचे आगमन झाले आणि आऊटफील्ड खूप ओले झाल्याने खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.