Breaking News Live : हरियाणात विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, काय आहे कारण?

Breaking News Live Updates : महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी कसा असेल आजचा दिवस? विधानसभा निवडणुकीआधी बड्या पक्षांमध्ये नेमकी कोणती खलबतं सुरुयेत? पाहा सर्व अपडेट एका क्लिकवर   

Breaking News Live : हरियाणात विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, काय आहे कारण?

Breaking News Live Updates : शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांनी केलेल्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात विरोधकांपासून इतरत्र त्यांच्या वक्तव्याचीच चर्चा पाहायला मिळाली. राज्याच्या राजकारणासह समाजकारणातही अशा अनेक गोष्टी घडत असून, घडणार असून प्रत्येक लहानमोठ्या बातमीचे अपडेट्स पाहा एका क्लिकवर...

31 Aug 2024, 19:41 वाजता

हरियाणात विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, काय आहे कारण? 

निवडणूक आयोगाने शनिवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख बदलून 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबर केली आहे. निवडणूक निकालाच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 4 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागणार होता. मात्र, आता 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांवर एकाचवेळी मतदान होत आहे.

31 Aug 2024, 19:34 वाजता

रुबिना फ्रांसिसने नेमबाजीत कांस्यपदक जिंकले

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने 5 पदके जिंकली आहेत. महिलांची 10 मीटर एयर पिस्टल (SH1)स्पर्धेत रुबिना फ्रांसिसने कांस्यपदक पटकावले आहे. नेमबाजीतील भारताचे हे चौथे पदक आहे. शेवटच्या दोन शॉट्समधील खराब गुणांमुळे रुबिनाचे रौप्यपदक हुकले.

31 Aug 2024, 19:10 वाजता

राज्यात आता 'हर घर दुर्गा अभियान', मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

राज्यात आता 'हर घर दुर्गा अभियान' सुरु होणार आहे. राज्यातील आयटीआयमध्ये आत्मसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. अशी घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. या अभियानात वर्षभर ज्युदो, कराटे यांसारखे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आठवड्यातून कमीत कमी दोन तासिका घेतल्या जाणार असून आयटीआयमध्ये वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

31 Aug 2024, 16:01 वाजता

लाडकी बहीण योजनेचे रिजेक्ट झालेले फॉर्म पुन्हा भरता येणार 

लाकडी बहीण योजनेचे रिजेक्ट झालेले फॉर्म पुन्हा सप्टेंबर महिन्यात भरता येणार आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता हा नवरात्रीच्या दिवसांमध्ये दिला जाणार आहे. अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. 

31 Aug 2024, 14:42 वाजता

स्वप्ना पाटकर यांना ईडी कार्यलयात हजर राहण्याचे आदेश

स्वप्ना पाटकर यांना ईडी कार्यलयात तातडीने बोलावण्यात आले आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं आहे. त्या अनुषंगाने आज त्यांना ईडी कार्यलयात बोलावले आहे.  त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना दुपारी 3 वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मनीषा कायंदे देखील त्याच ठिकाणी त्यांची भेट घेणार आहेत.

31 Aug 2024, 12:23 वाजता

Breaking News Live Updates : पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ ?

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ ? पत्राचाळ जमीन घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी. पत्राचाळ प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा स्वप्ना पाटकर यांचा आरोप. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी अतिरिक्त संचालक (पश्चिम क्षेत्र), ईडी यांना लिहिलं पत्र.

31 Aug 2024, 12:11 वाजता

Breaking News Live Updates : कांद्याचे दर वाढले 

पावसामुळे कांद्याचे काही ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची अवाक कमी झाली आहे. त्यामुळे एपीएमसी मध्ये 50 रुपये किलो पर्यंत कांद्याचे दर वाढले आहेत. तर भाजीपाला बाजारात याच कांद्याला ग्राहकांना 60 रुपये प्रति किलो मोजावे लागत आहेत. कांद्याचे दर वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. त्यामुळे व्यापार्यांनी साठवलेल्या कांद्यालाच दर मिळत आहे. 

31 Aug 2024, 11:25 वाजता

Breaking News Live Updates : मविआत अखेर  जागावाटपाचा तिढा सुटला 

महा विकास आघाडीमध्ये मुंबईतील जागा वाटपासंदर्भात तिढा जवळपास सुटला असून, मुंबईतल्या 31 मतदारसंघाबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. आता फक्त 5 मतदारसंघात तिढा कायम असल्याची माहिती समोर येत आहे. कुर्ला, अणुशक्तीनगर, वर्सोवा, सायन आणि भायखळा या 5 मतदारसंघात अजूनही MVA मध्ये चर्चा सुरूच आहे. मुंबईत काही ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच आहे तर काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा जागावाटपाच्या बैठकीत हा तिढा सुटला जाण्याची शक्यता आहे. 

31 Aug 2024, 11:14 वाजता

Breaking News Live Updates : शिवरायांच्या पुतळ्याविषयी  कोणीही स्वतःच्या लाभासाठी राजकारण, भांडवल करु नये; उदयनराजेंची प्रतिक्रिया 
 
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटने बाबत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे यामध्ये त्यांनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले आहे या घडलेल्या दुर्घटनेचे कारण कच्चा दुवे आणि निसर्गाची अवकृपा ही प्रमुख कारणे त्यांनी सांगितले असून कोणीही या घटनेचे स्वतःच्या लाभासाठी भांडवल करू नये. या घटनेत विशेष कोणाला लक्ष बनवणे टाळले पाहिजे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. आणि समुद्र तटीय निसर्ग नियमांचा आणि वातावरणाचा बदलाचा पुरेपूर अभ्यास करून छत्रपती शिवरायांचा प्रेरणा देणारा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभा करावा असे प्रसिद्धी पत्रक काढले आहे.

 

31 Aug 2024, 10:39 वाजता

Breaking News Live Updates : बदलापूर मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेची पीडित मुलीसमोर ओळख परेड  

कोणत्याही गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाकडून आरोपीची ओळख परेड करण्यात येते त्यानुसार आता बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदे यांची आता पीडित मुलीसमोर ओळख परेड करण्यात येणार आहे, एसआयटीने आरोपीची ओळख परेड करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता ,त्यानुसार आता न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याची ओळख ओळख परेड करण्यासाठी परवानगी दिली आहे, सध्या अक्षय शिंदे हा तळोजा येथील न्यायालयीन कोठडीत आहे त्यामुळे आता येत्या एक ते दोन दिवसात जेलमध्ये अक्षय शिंदे यांची पीडित मुली समोर ओळख परेड करण्यात येणार आहे , पीडित अत्याचार प्रकरणांमध्ये कोणतेही त्रुटी राहू नये म्हणून ही ओळख परेड करण्यात येणार आहे.