Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्र्यांचे सचिवपदी श्रीकर परदेशी यांची निवड

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्र्यांचे सचिवपदी श्रीकर परदेशी यांची निवड

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्र्यांचे सचिवपदी श्रीकर परदेशी यांची निवड

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर आलेत. दादरमधील चैत्यभूमीवर भीम अनुयायांनी गर्दी केलीय. तर काल देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात जाऊन नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक घेतली. तर आज महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी चैत्यभूमीवर हजेरी लावली. 

6 Dec 2024, 13:09 वाजता

मंत्रिपदासाठी महायुतीतील आमदारांची लॉबिंग

मंत्रिपदासाठी महायुतीतील आमदारांची लॉबिंग...-मराठवाड्यातून 20 ते 22 आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक तर लातूर जिल्ह्यात 5 जणांना हवं मंत्रिपद.  

6 Dec 2024, 12:16 वाजता

खासदारांच्या खुर्चीखाली नोटांचं बंडल, राज्यसभेत गोंधळ

खासदारांच्या खुर्चीखाली नोटांचं बंडल असल्याचा आरोप राज्यसभा सभापतींचा कॉंग्रेसवर गंभीर आरोप. या नोटा खऱ्या की खोट्या याचा तपास सुरु आहे. त्याशिवाय चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. 

6 Dec 2024, 12:02 वाजता

जालन्यात अवकाळी पावसाची हजेरी

जालन्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लावलीय. जालना,बदनापूर, भोकरदन, अंबड,जाफ्राबाद तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी लावलीय. गहू, हरभरा,ज्वारी  उत्पादकांना दिलासा मिळालाय. मात्र, कापूस पिकाला फटका बसलाय.

 

6 Dec 2024, 10:43 वाजता

दादरमध्ये भीम अनुयायांसाठी पालिकेकडून खास व्यवस्था 

चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी रांगा लावल्याचं दिसतंय.  शिवाजीपार्क मैदानात भीम अनुयायांसाठी पालिकेनं खास व्यवस्था केलीय.पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आलाय. यांमध्ये सुरक्षा व्यवस्थेबरोबरच अनुयायांना दिशा दाखवणे, गर्दीचे नियमन करणे यासाठी शेकडो समता सैनिक तैनात आहेत.

 

6 Dec 2024, 10:41 वाजता

महाडमध्ये मध्यरात्री कँडलमार्च ते चवदार तळे आणि क्रांतीस्तंभ येथे स्वतंत्र कार्यक्रम 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त महाडमध्ये मध्यरात्री आदरांजली वाहण्यात आली. चवदार तळे आणि क्रांतीस्तंभ येथे दोन स्वतंत्र कार्यक्रम आयोजीत केले होते....यावेळी मेणबत्त्या पेटवून  अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. 

6 Dec 2024, 10:40 वाजता

जर तुम्ही घर घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी...

चालू वर्षात घरांच्या किमतीत साडेचार टक्क्यांची वाढ झाल्यानंतर आता पुढच्या वर्षात देशातील प्रमुख शहरांतील घरांच्या किमती साडेसहा टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. देशातील प्रमुख शहरांत दोन वर्षांपासून घरांची विक्रमी विक्री झाली.  शहरांत मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे घरांच्या किमती वाढत असताना बांधकाम साहित्यही महागलंय. त्यामुळे घराच्या किमतीत आणखी वाढ झालीये. त्यात दोन वर्षांनी म्हणजेच 2026 साली घरांच्या किंमतीत साडेसात टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. 

6 Dec 2024, 10:34 वाजता

मुंबई विमानतळावर 1 कोटीचं सोनं जप्त

-फूड स्टॉलच्या कर्मचाऱ्यासह दोघांना अटक
-दुबईतून मुंबईत दीड किलो सोन्याची तस्करी
-आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश

6 Dec 2024, 10:34 वाजता

म्हाडाची विरार, कल्याण आणि ठाण्यातील घरांसाठी नवीन योजना

म्हाडाने आता प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य योजना सुरु केलीय.  म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेत जाहीर करण्यात आलेल्या विरार, कल्याण आणि ठाण्यातील अल्प उत्पन्न गटातील घरांना सोडतीत प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. विरार, कल्याण, ठाण्यात जवळपास 14 हजार घरं प्रतिसादाविना पडून आहेत. यासाठी 2 डिसेंबर ते 11 डिसेंबर काळात अर्ज करता येणार आहेत. विरारच्या बोळींज, कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण, ठाणे तालुक्यातील गोठेघर आणि भंडार्ली इथे ही घरं आहेत.