Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारस्थापनेसह महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडणार आहे. शपथविधी ते अन्य महाराष्ट्रातील घडामोडीचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
5 Dec 2024, 08:56 वाजता
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला नाशिकचे साधू महंत लावणार हजेरी
Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: मुंबईच्या आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या रंगणार्या ऐतिहासिक सोहळ्यात, राज्य शासनानं त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू-संतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केलं आहे. रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत भक्तिचरणदास, महंत गणेशानंद सरस्वती, महंत रमणगिरी महाराज, माधवदास राठी, ह.भ.प. संजय धोंडगे, महंत सुधीरदास पुजारी, स्वामी संविदानंद सरस्वती, कांचनताई जगताप अशा मान्यवरांचा समावेश आहे.
5 Dec 2024, 08:28 वाजता
एकनाथ शिंदे आज घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ? शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित
Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: काल शिवसेना मधील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली असून आपण सत्तेत असले पाहिजे या आमदारांच्या मतांशी शिंदे यांनी सहमती दाखवली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्याच बरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतही जी चर्चा झाली ती सकारात्मक झाली अशी खात्रीपूर्वक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
5 Dec 2024, 08:20 वाजता
Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद किती जणांना?
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत २० जणांनी मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यातील सात जणांना एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
एकापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारे नेते
- शरद पवार (४ वेळा)
- वसंतराव नाईक (३ वेळा)
- वसंतदादा पाटील (३ वेळा)
- शंकरराव चव्हाण (२ वेळा)
- अशोक चव्हाण (२ वेळा)
- विलासराव देशमुख (२ वेळा)
- देवेंद्र फडणवीस (आता तिसन्यांदा)