Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला आणि पक्षाचे मालक हे नाही तर आम्ही आहोत सांगितलं अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ज्यांच्या हातात सगळं काम दिलं, त्यांनी एक दिवसच पक्षच घेऊन टाकला असंही यावेळी ते म्हणाले. तसंच 4 वेळा तुम्हाला पद मिळालं, एखाद्या वेळी नाही मिळालं तर घड मोडायचं नसतं अशा शब्दांत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं.
"ज्यांच्या हातात सगळं काम दिलं, त्यांनी एक दिवसच पक्षच घेऊन टाकला आणि दुसरीकडे जाऊन बसले. तिकडे पद मिळालं हे मान्य आहे. पण त्याआधी 4 वेळेल ते पद मिळालंच होतं. 4 वेळा तुम्हाला पद मिळालं, एखाद्या वेळी नाही मिळालं तर घड मोडायचं नसतं. मी घर फोडलं असं बोलले आहेत. फार गमतीची गोष्ट आहे. घर फोडायचं काय कारण? कुटुंबातील वडीलधारा मी आहे. आजपर्यंत माझं ऐकतही होते. मी त्यांच्या मनाच्या विरोधात काही करत नव्हतो आणि करणारही नाही. येथून पुढे कोणीही चुकीची भूमिका घेतली तरी मी चुकीच्या रस्त्याने जाणार नाही. कुटुंब एक राहील याची मी काळजी घेईन. हा माझा स्वभाव आहे," असं शरद पवारांनी सांगितलं.
"पक्ष मी स्थापन केला आणि एके दिवशी काही लोकांनी आमच्यावर खटला केला. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला आणि पक्षाचे मालक हे नाही तर आम्ही आहोत सांगितलं. सुनावणी झाली. एक नंबरचं समन्स शरद गोविंदरावर पवार होतं. समन्स आल्यावर हजर राहावं लागतं. मी कधी समन्स पाहिला नव्हता. कोर्टात गेलो, तिथे उभा राहिलो. माझ्याविरोधात चिरंजीवांची तक्रार होती. माझ्या आयुष्यात कधी असं घडलं नव्हतं. ती केस करुन मला कोर्टात खेचलं गेलं. केंद्र सरकार त्यांच्या हातात होतं. तिथे काय चक्रं फिरली माहिती नाही. पक्ष आणि चिन्ह त्यांचं आहे आणि शरद पवारांचा काही संबंध नाही असं सांगण्यात आलं," असं शरद पवार म्हणाले.
"सुप्रिया सुळे निवडणुकीला उभ्या असताना समोर सुमित्रा होत्या. साहेत येतील, भावनांना घात हालतील अशी भाषण केली होती. पण तुम्ही भावनाप्रधान होऊ नका असं आवाहन मतदारांना करण्यात आलं होतं. साहेब येतील, डोळ्यात पाणी आणतील आणि मत द्या सांगतील तेव्ह तुम्ही भावनाप्रधान होऊ नका असा सल्ला दिला," याची आठवण शरद पवारांनी करुन दिली. यानंतर त्यांनी खिशातून रुमाल काढून डोळे पुसत अजित पवार रडतानाची नक्कल केली.