प्रताप सरनाईक, झी मीडिया, कोल्हापूर : राज्यात शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी (Maharashtra Political Crisis) करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला सुरुंग लावण्याचा सपाटा कायम ठेवला. शिंदे गटाने शिवसेनेच्या आमदारांनंतर, खासदार, नगरसवेक इतकंच काय संघटनात्मक पातळीवरील कार्यकर्तेही फोडले. या बंडखोरीमुळे शिवसेना (Shiv Sena) आणि निष्ठावंत शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. शिवसैनिक आता बंडखोरी केलेल्या खासदाराविरोधात येत्या सोमवारी मोर्चा काढणार आहेत. (maharashtra political crisis kolhapur shiv sainik will movement on 8 august mp sanjay mandalik home at shivaji park)
कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी बंडखोरी केली आणि शिंदे गटात सामिल झाले. मंडलिकांविरोधात येत्या सोमवारी (8 ऑगस्ट) मोर्चा काढणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी याबाबबतची माहिती दिली आहे.
खासदार मंडलिक यांच्या कोल्हापुरातील शिवाजी पार्क इथल्या घरावर दुपारी 12 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी होणार असल्याचा दावाही देवणे यांनी केला आहे. मोर्च्यादरम्यान गद्दारीबद्दल मंडलिकांना शिवसैनिक जाब विचारणार आहेत.
दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख देवणे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यावरही निशाणा साधला आहे. "शेवाळेंना सध्या काही काम नाही. त्यांना मुंबईत कोणी विचारेनासा झालंय. शेवाळेंचं मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर तोंड बंद होईल", असंही देवणे म्हणाले.