दिलासादायक! राज्यातील रुग्णसंख्येत घट, दिवसभरात किती पॉझिटिव्ह?

राज्यातील जनतेसाठी काही प्रमाणात दिलासादायक बातमी आहे.  

Updated: Jul 2, 2021, 08:16 PM IST
दिलासादायक! राज्यातील रुग्णसंख्येत घट, दिवसभरात किती पॉझिटिव्ह?  title=
मुंबई :  राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात दररोज 9 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत होते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेकडून चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान आज (2 जुलै) कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी काही प्रमाणात दिलासादायक बातमी आहे. (Maharashtra today 2 July 2021 8 thousand 753 new corona patients found)

 

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये  8 हजार 753  नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज एकूण 8 हजार 385 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 58 लाख 36 हजार 920 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा (Recovery Rate) 96.01 % इतका झाला आहे.
 
दिवसभरात किती मृत्यू? 
 
कोरोनामुळे दिवसभरात 156 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर हा 2.01 %  इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  4,20,96,506 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,79,352 (14.44 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 6,24,745 व्यक्ती होमक्वारटाईनमध्य आहेत तर 4,472 व्यक्ती सस्थातमक क्वांरटाईन आहेत. 
 
भारत तिसऱ्या क्रमांकावर 
 
भारतात आता  कोरोनामुळे 4 लाख जणांपेक्षा अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे सर्वाधिक मृत झालेल्यांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर अमेरिका आघाडीवर आहे. 
 
संबंधित बातम्या :