Weathr Update : उत्तरेकडे वाढला थंडीचा कडाका; राज्यातील तापमानात मोठे चढ- उतार, IMD नं इशारा देत म्हटलं...

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे सध्या थंडीचा कडाका पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. तर, महाराष्ट्रात मात्र तापमानाची चढ उतारानं चिंता वाढवली आहे.   

सायली पाटील | Updated: Jan 27, 2025, 08:16 AM IST
Weathr Update : उत्तरेकडे वाढला थंडीचा कडाका; राज्यातील तापमानात मोठे चढ- उतार, IMD नं इशारा देत म्हटलं...  title=
Maharashtra Weather news 27 jan from kashmir to himachal cold wave continues maharashtra will experiance temprature fluctuation

Maharashtra Weather news : मुंबई, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीनं काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. हवामानाची ही स्थिती कायम राहणार असून, या भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये किमान तापमानाच वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रही इथं अपवाद ठरणार नसून, या भागांमध्ये तामपानाचा आकडा 2 ते 3 अंशांनी वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

सध्या सूर्य उत्तरायणात असल्यानं दिवस मोठा होत जाणार असल्याचं नैसर्गिक चक्र पाहायला मिळेल. तर, 'ला निना'चा प्रभाव कमी असल्यामुळे हिंदी महासागराच्या पृष्ठासह अंतर्गत भागातील पाण्याचं तापमान समान राहणार असून, त्यामुळं काही प्रमाणात किनारपट्टी क्षेत्रांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. राज्याच्या घाटमाथ्यावरील भागांमध्ये धुक्याची चादर पुढील काही दिवस कायम राहणार असून, सूर्य डोक्यावर येईपर्यंत या भागांमध्ये हवेत दारठा जाणवेल असा प्राथमिक अंदाज आहे. 

हेसुद्धा वाचा : Coronavirus बाबत जगाला हादरवणारा खुलासा; नेमकी कुठून झाली उत्पत्ती? ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येताच चीनवर गंभीर आरोप

उत्तराखंडमध्ये थंडीचा कडाका कमी 

मागील काही दिवसांमध्ये उत्तराखंडमध्ये हवा कोरडी झाली असून, मैदानी क्षेत्रांमध्येसुद्धा उन्हाचा कडाका दिसून येत आहे. तर, पर्वतीय क्षेत्रांमध्ये मात्र तापमानातील घट कायम असल्यामुळं इथं हवामानात काहीसे अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. 

केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार एकिकडे उत्तराखंडमध्ये यंदाच्या वर्षातील सर्वात कमी हिवाळ्याची नोंद होत असतानाच तिथं हिमाचल प्रदेशात थंडीचा कडाका कायम आहे. परिणामी हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणासह जम्मू काश्मीकरच्या खोऱ्यात थंडीच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.