Mahatransco Bharti 2023: राज्य सरकारच्या महापारेषणमधील नोकरीची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडने बंपर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
महापारेषणमध्ये विविध पदांच्या एकूण 2 हजार 501 रिक्त जागा भरल्या जातील. यात विद्युत सहाय्यक (पारेषण), सिनिअर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 या पदांचा समावेश आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विद्युत सहाय्यक (पारेषण) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली अंतर्गत वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहेत. उमेदवारांकडे तसे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांला संबंधित कामाचा अनुभव असणे
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. यासाठी 20 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 10 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
विद्युत सहाय्यक (पारेषण), सिनिअर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्या. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबई पालिकेती भरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री ऑपरेटरची 19 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएम/डीएनबी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा. 22 आणि 23 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज डिस्पॅच विभाग, तळमजला, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायरची जी बिल्डिंग हॉस्पिटल, मुंबई – 400008 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.