Jitendra Awad News : शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनातून बाहेर येत असताना पायऱ्यावरून उतरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडता पडता वाचले. यानंतर असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांच्यासह घडला आहे. मुंब्रा येथे कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड पडता पडता वाचले आहेत. स्टेजवर उपस्थित असलेल्या कार्यकत्यांनी त्यांना पकडले. याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral ) झाला आहे.
4 फेब्रुवारी रोजी मुंब्रामध्ये आमदार प्रीमियर लीगचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. अंतिम सामन्याच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी मंत्री आणि कळावा मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड येथे उपस्थित होते.
यावेळी आव्हाड स्टेजवर आले असता ते स्टेजवरील खुर्चीत बसणार इतक्यात नेमकं त्याच वेळी त्याठिकाणचा स्टेजचा काही भाग खचला. स्टेजवर उपस्थित असलेल्यांनी आव्हाड यांना पकडले.
आव्हाड यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आव्हाड यांना सावरले. तसेच खचलेल्या स्टेजपासून दूर नेले. यामुळे सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. त्यानंतर हा कार्यक्रम सुरळित पार पडला. मात्र. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड पडता पडता वाचले...पाहा व्हिडिओ pic.twitter.com/zV5VF2p9DR
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 5, 2023
अधिवेशनावेळी विधानभवनातून बाहेर येत असताना पायऱ्यावरून उतरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोल गेला. मात्र, त्यांच्या बरोबर चालणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना हात देत सावरले. यामुळे मुख्यमंत्री पडता पडता वाचले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.