Monsoon News and Weather Update : राज्यात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी हवामान बदल जाणवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 22 ते 24 मे दरम्यान वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पाऊस महाराष्ट्रात विदर्भात पडेल. त्याचवेळी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही पाऊड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. हा मान्सून पुढे सरकत आहे. काल मान्सूनने बंगालचा उपसागर व्यापण्यास सुरुवात केली आहे.
मान्सून बंगालचा सागर पार करुन कर्नाटकात पोहोचण्यास एक आठवड्यांचा कालवधी लागण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल झालाय. अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल दिसून येत आहे. मान्सून पुढे सरकत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेय.
महाराष्ट्र राज्यात विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागात उष्णतेचा झळा जाणवणार आहेत. कोकणात उन्हाचा कहर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, विदर्भात 22 ते 24 मे दरम्यान पाऊस, तर उर्वरित राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. तर उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तयार झाल्याने मध्य प्रदेशातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
झळा त्या लागल्या जीवा ...
P u n e आज Tmax pic.twitter.com/ofTHWkHajP— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 20, 2023
राज्यात फक्त विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहणार असून, कोकणला वेदर डिसकम्फर्टचा पुन्हा इशारा देण्यात आला आहे. राज्यांमधील अनेक शहरांमध्ये मे हिटचा तडखा बसत आहे. राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. शिरुर 42, पंढरपूर 40.9, कोरेगाव पार्क 40.01 अंश सेल्शिअर तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील पोहोचला आहे. अंदमानात शुक्रवारी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल पुढच्या दिशेने सुरू झाली आहे. शनिवारी बंगालचा उपसागर व्यापण्यास सुरुवात केली आहे. बंगालचा उपसागर विस्तीर्ण असल्याने तो पूर्ण पार करण्यास मान्सूनला आठ दिवसांचा कालावधी लागू शकतो, त्यानंतर तो कर्नाटककडे येईल, असा अंदाज आहे. यामुळे यावर्षी मान्सून तीन दिवस उशीरा येणार होता. परंतु आता त्याची वाटचाल अनुकूल राहिली तर केरळमध्ये 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. केरळमध्ये तीन ते चार जूनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे महाराष्ट्रात 7 जूनपर्यंत येणार मान्सून दाखल होऊन मुंबईत तो 11 जून आधीच दाखल होण्याची शक्यता आहे.