MPSC Hall Ticket 2023 : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच (MPSC Exam 2023 ) परिक्षा 30 एप्रिल 2023 ला होणार आहे. मात्र त्यापूर्वीचा या स्पर्धा परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल झाल्याची बातमी समोर येत. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, आणि क च्या परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल झाले. एका टेलिग्राम चॅनलवर 90 हजारांपेक्षा जास्त हॉल तिकिट अपलोड करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर आयोगाने सायबर पोलिसात दाखल केली आहे.
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. pic.twitter.com/UP9hnZgUGB
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 23, 2023
दरम्यान, 30 एप्रिल 2023 ला होणार्या MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षे गट 'ब', 'क'च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक करण्यात आले आहे. यामध्ये लाखो विद्यार्थ्यांची माहिती हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हॉलतिकीट हॅक झाली आहे. विद्यार्थ्यांची हॉल तिकीट टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आली आहे. तसेच या परीक्षेचा पेपर देखील आपल्याकडे असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे.
This is a very serious matter, repeatedly we can see cases of paper leak & other manipulations in competitive examinations.
No matter whose govt it is, things are not changing.
This purely means that bureaucracy is responsible for this mistakes & strict action should be taken… https://t.co/qh4mvxi17I— Satyajeet Tambe (@satyajeettambe) April 23, 2023
संयुक्त पूर्वपरीक्षा 30 एप्रिल 2023 ला होणार आहे. यापूर्वी पेपर आणि हॉल तिकीट फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणानंतर सायबर पोलीस येऊन त्याचा तपास करतील. सत्यता पडताळल्यानंतर वेळापत्रकानुसार पेपर कधी होणार हे निश्चित होईल. यासाठी 4-5 दिवस वाट पाहावी लागणार आहे.
हॉल तिकीट हॅक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एमपीएससी परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि नेटकरी नाराज झाले आहेत. हे विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करतात. शिंदे-फडणवीस सरकार याबाबत प्रश्न विचारत आहे. सरकार काय झोपा काढतयं का? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे.