दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) महत्वाचा निर्णय घेतलाय. MPSC ची 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता MPSC परीक्षा पुढे ढकला अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) यांनी महत्वाची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री,अधिकारी यांच्याबरोबर व्हीसी मार्फत ही बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना 11 एप्रिल रोजी होणार परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. त्या पार्शवभूमीवर ही बैठक असेल.
दरम्यान ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. 11 एप्रिल रोजी एमपीएससीची परीक्षा आहे. मात्र अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.