मुंबई : एका तरुणावर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. समाजमाध्यमांवर आपण एकमेकांचे मित्र असून आपण ओळखत असल्याचे सांगत फसवून या तरुणावर अत्याचार करण्यात आला.
पीडित तरुणाला चार जणांनी बोलण्यातून आपल्या जाळ्यात अडकवले. आपण फेसबुकवरचे मित्र असल्याचे चित्र त्याच्यासमोर त्यांनी निर्माण केले. सुरुवातीला पिडित तरुणाचा यावर विश्वास बसला नाही. पण त्यावर जबरदस्ती करुन ते बिंबवण्यात आले.
त्यानंतर त्या पीडित तरुणाचे मोबाईल, पाकीट आणि इतर साहित्य घेऊन त्याच्या क्रिडेट कार्डवर दोन हजार रुपयांचं पेट्रोलही आरोपींनी भरलं. त्यानंतर कार मधून तरुणाला ढकलून दिलं. कुर्ल्याच्या एलबीएस मार्गावर रात्री हॉटेल जवळ तरुण थांबला होता. त्यावेळी त्याला फसवून नेण्यात आलं.