मुंबई : गेले अनेक महिने मंत्रिपदासाठी भाजपानं झुलवत ठेवलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राज्यसभा उमेदवारीची चर्चा आता सुरू झाली आहे.
भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नारायण राणे यांच्यात दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीला आमदार नितेश राणे, आणि आशिष शेलार यांनीही हजेरी लावली होती.ही बैठक अमित शाह यांच्या निवासस्थानी 11 अकबर रोड येथे रात्री सव्वा अकरा वाजता सुरु झाली.
साधारण एक तास ही बैठक सुरु होती. भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही सध्या दिल्लीत आहेत. नेमकी हीच वेळ साधून राणे दिल्लीत पोहोचले होते. . पुढल्या महिन्यात राज्यातल्या राज्यसभेच्या 6 जागा रिक्त होत आहेत. विधानसभेतल्या संख्याबळानुसार भाजपाचे 3 खासदार निवडून येऊ शकतात. त्यामुळे भाजपाच्या कोट्यातून राणेंची वर्णी लागण्याची शक्यता आता वर्तवली जातेय. मात्र आपल्या दिल्लीवारीत राणे कुणाची भेट घेणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान
राणे यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येतोय. तसेच त्यांना राज्यसभेची उमेदवारीची ऑफर देण्यात आलीची माहितीही सूत्रांनी दिली आहे.