धुळे : जिल्ह्यात 15 एप्रिल 2021 पर्यंत रात्रीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दिवसा शासनाच्या नियमानुसार कामकाजाला मुभा असणार आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदेशाची कठोर अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला आहे. 27 तारखेपासून संचारबंदी लागू केल्यानंतर आता 15 एप्रिलपर्यंत रात्रीच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवसाची संचारबंदी उद्या सकाळी संपणार आहे. पण आता रात्री पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सर्व आस्थापनांमध्ये ही कठोर कारवाई होणार आहे. या नियमांची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्या लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.