नाशिक : Helmet compulsory in Nashik : आता दुचाकीस्वारांसाठी महत्वाची बातमी. हेल्मेट सक्ती (Helmet compulsory) करताना कठोर नियम करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये हेल्मेट सक्तीसाठी नवा नियम पुढील महिन्यापासून लागू होणार आहे. त्यानुसार शासकीय कार्यालयात आणि पेट्रोल पंपावरही विना हेल्मेट नो एन्ट्री असणार आहे. (No helmet, no petrol and no access to government offices in Nashik)
स्वातंत्र्य दिनापासून विना हेल्मेट पेट्रोल बंदी झाल्यानंतर नाशिक शहरात आता 6 नोव्हेंबरपासून कुठल्याही शासकीय कार्यालयात विना हेल्मेट 'नो एन्ट्री' असणार आहे. शिवाय पेट्रोल पंप परिसरातच विना हेल्मेट वाहनधारकांना प्रवेश निर्बंध घालण्यात आले आहेत.
पेट्रोल पंप चालक आणि स्थानिक पोलिसांशी वाद घातल्यास संबंधितावर चॅप्टर केस करण्यात येणार आहे. शहरातील वाढते अपघात आणि त्यात होणारी मृत्यू बघता पोलीस आयुक्तांनी हे कठोर धोरण अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे.