पुणे : Income tax officer's raid : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar) यांनी आयकर विभागाच्या धाडीनंतर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या साखर कारखान्यांवर इन्कम टॅक्स अधिकारी छापे मारले. (Income tax officer raid) जवळपास पाच ते सात दिवस चौकशी सुरु होती. याबाबत अजित पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. आपण कारखाने कितीला घेतले, कोणते विकले याची यादी पत्रकार परिषदेत देणार आहे. आपण कधी बेईमानी केलेली नाही, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारला जे अधिकार आहेत, त्यानुसार त्यांनी काम करावे. राज्यांचेही काही अधिकार आहेत, त्यांना तसे काम करु द्यावे. त्याचवेळी राज्यांनीही कोणाबद्दल कोणताही आकस न ठेवता काम करावे आणि यंत्रणेचा गैरवापर करु नये, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांच्या बहिणींच्या संबंधित कारखान्यांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता. त्यावेळी अजित पवार यांनी पाहुणे आले आहेत, ते जाऊ देत. नंतर मी बोलेन असे सूचीत केले होते. आता अजित पवार यांनी आपण पत्रकार परिषद घेऊन कारखाने कोणी कितीला दिलेत, कोणते विकले याची यादी देणार आहे. आपण कधी बेईमानी केलेली नाही, असे स्पष्ट करत त्यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.
दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हाती आलेले पिक वाया गेले आहे. शेतकरी अडचणीत आला आहे, असे असताना काही पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. तसे प्रकार समोर येत आहेत. अशा पिक विमा कंपन्यांना यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी चांगलाच दम भरला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन आणि इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.