मुंबई : गेल्या आठवडाभर कोसळणाऱ्या पावसाने शनिवारपासून थोडी उसंत घेतली आहे. राज्यात पुढचा आठवडाभर पाऊस पडणार नाही असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. गडगडाटासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने चक्क आठवड्याभराचा आराम घेतला आहे. (No Rainy weather in the state for next week, weather department information) यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला आहे. यावर्षी मान्सून लवकर दाखल झाला असा आनंद व्यक्त केला जात असताना आता अनेक भाग कोरडेच राहणार आहे.
मोसमी वारे सक्रीय असले तरी सहारा भागातून येणा-या धूलिकणांमुळे सध्या ढगांच्या निर्मितीला पोषक स्थिती नसल्याने हा परिणाम जाणवत असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. राज्याच्या अनेक भागांत पुढील आठवडाभर अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. कोकण किनारपट्टीतही पावसाचं प्रमाण कमी झालंय. अनेक भागांत पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊस झाल्यानं असल्याने बहुतांश शेतक-यांनी पेरण्या पूर्ण केल्यात. मात्र आता या शेतक-यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे.
493.1 mm Rainfall is Normal rainfall for June for Santacruz-Mumbai & is based in RF data frm 1981-2010.
Realised rainfall as on date; 14 June at Santacruz is 719.3 mm which is already ~ 40% excess.
Most of it came from 3 Heavy & one Extremely Heavy rainfall (> 200 mm) events. pic.twitter.com/U4dNZdPeao— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 14, 2021
सहारा भागातून येणा-या धूलिकणांचा परिणाम झाल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. यामुळे मोसमी वारे सक्रिय, पण राज्यातील पाऊस गायब झाल्याचा अंदाज हवामान खात्यान वर्वली आहे. राज्यात पुढचा आठवडाभर पाऊस पडणार नाही असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.